नशा केल्याचा विरोध करणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:32 IST2019-04-12T18:29:01+5:302019-04-12T18:32:21+5:30

गॅरेजमध्ये एकाचा खून : आरोपीला अटक

In protest against drug addiction, | नशा केल्याचा विरोध करणे पडले महागात

नशा केल्याचा विरोध करणे पडले महागात

ठळक मुद्देगोरेगाव पूर्वच्या गोकुलधाम परिसरात नागुमामा कंपाऊंडमध्ये एक गॅरेज आहे. याप्रकरणी मारेकऱ्याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.गुरुवारी सकाळी टायर कापण्याच्या कैचीने त्याने बेसावध झोपलेल्या तनवीरला भोसकून त्याची हत्या केली.

मुंबई - नशा करण्याला विरोध करणे तरुणाला महागात पडले. या रागातून सहकाऱ्याने त्याचा खून केला. गोरेगावमध्ये गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मारेकऱ्याला दिंडोशी पोलिसांनीअटक केली आहे.
गोरेगाव पूर्वच्या गोकुलधाम परिसरात नागुमामा कंपाऊंडमध्ये एक गॅरेज आहे. गुरुवारी सकाळी तनवीर शेख (२५) नामक इसमाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिंडोशी पोलिसांनी ताब्यात घेतला. तनवीर, मोहम्मद फिरोज खान (२५) हे गॅरेजमध्ये काम करतात. तसेच ते रात्री गॅरेजमध्ये झोपतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. मोहम्मदला नशा करण्याची सवय आहे. त्यामुळे तनवीर व त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला गॅरेजमध्ये झोपण्यास विरोध केला. त्याच कारणावरून तनवीर व मोहम्मद यांच्यात बुधवारी भांडणं झाले. त्याचा राग मोहम्मदच्या मनात असल्याने तनवीरचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. गुरुवारी सकाळी टायर कापण्याच्या कैचीने त्याने बेसावध झोपलेल्या तनवीरला भोसकून त्याची हत्या केली.

Web Title: In protest against drug addiction,