Prostitution under the name of 'spa' in Mira Road, two arrested | मीरारोडमध्ये 'स्पा'च्या नावाखाली वेश्या व्यवसाय, दोघांना अटक

मीरारोडमध्ये 'स्पा'च्या नावाखाली वेश्या व्यवसाय, दोघांना अटक

मीरारोड : मीरारोडच्या एका इमारतीतील सदनिकेत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे नया नगर पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणले आहे.  या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे .
मीरारोडचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक आशुतोष चव्हाणसह संधू, माने, पवार यांच्या पथकाने सदर कारवाई सोमवारी केली. 
रेजुवनी वेलनेस स्पा या नावाने ड्रिमलँड सोसायटीच्या इमारत क्रमांक २९ मधील १०४ क्रमांकाच्या सदनिकेत वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री होताच धाड टाकली.
पीडित महिलेस वेश्या व्यवसाय करायला लावणारी  विधू वासुदेवन वासुदेव (४५) व अजिथ बिजू (२३) रा. शांती नगर या दोघांना पोलिसांनी पिटा कायद्याखाली अटक केली आहे. आरोपीना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 
गेल्या वर्षभरा पासून आरोपी हे पीडित महिलेच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय करायला लावत होते. आरोपी हे मूळचे दक्षिण भारतातील असून पीडित देखील आंध्रप्रदेशची आहे.

Web Title: Prostitution under the name of 'spa' in Mira Road, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.