पिंपरी, भोसरीत वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या तीन लाॅजवर छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 22:54 IST2021-02-10T22:51:25+5:302021-02-10T22:54:04+5:30
Crime News: पीडित सात महिलांची सुटका : १५ जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी, भोसरीत वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या तीन लाॅजवर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या तीन लाॅजवर पोलिसांनी छापा टाकून सात महिलांची सुटका केली. तसेच याप्रकरणी १५ संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
डाॅ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी व भोसरी येथील लाॅजवर काही महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी प्लाझा लाॅज, काळेवाडी रोड, पिंपरी व कल्पना लाॅज, गोकुळ हाॅटेलजवळ, तसेच भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाॅटेल कावेरी लाॅज, दिघी रोड, भोसरी या तीन लाॅजवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत असलेल्या सात पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली.
हाॅटेल सिटी प्लाझा लाॅजचे चिरंजित देवाशीश सरकार (वय २५), जय भीमबहाद्दूर विश्वकर्मा (वय २०), तिलक कर्ण थापा (वय १९), आकाश प्रदीप बिशी (वय २२), प्रवीण जयसिंग गंगावणे (वय ६०, सर्व रा. सिटी हाॅटेल, काळेवाडी रोड, पुणे), अव्दुल हमीद (रा. मोरवाडी चाैक), तसेच कल्पना लाॅजचे जयकुमार श्रीगणेश यादव (वय २५), अजितकुमार श्रीउतीन साव (वय ३५, दोघेे रा. कल्पना लाॅज, पिंपरी), बबलू प्रसाद, जयराम आणा गोड्डा, शांता पुजारी उर्फ छोटू, दीपक कटारिया (रा. पिंपरी), तसेच हाॅटेल कावेरी लाॅजचे गोपाळ लिंबा पाटील (वय २५), समाधान प्रकाश वाघ (वय २६, दोघेही सध्या रा. कावेरी हाॅटेल, दिघी रोड, भोसरी) बाळाअण्णा शेट्टी (हाॅटेलचालक) यांच्याविरोधात पिंपरी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे, भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.