Prostitution racket was running in 20 rental room; Police bursted | २० भाड्याच्या रूममध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश 
२० भाड्याच्या रूममध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश 

ठळक मुद्देपोलिसांनी ८ मोबाईल, १६ हजार रुपये आणि १ कार जप्त केली आहे. २० रूम भाड्याने घेतल्या. त्यासाठी तो महिन्याला ५ लाख भाडे देत होता.

मुंबई - अंधेरी येथील जेबी नगरमधील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचे थेट जमशेदपूर कनेक्शन उघडकीस आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींचा जमशेदपूरमध्ये संपर्क असल्याचे समोर आले आहे. अंधेरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मुंबई गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून अंधेरी येथील जेबी नगरमधील एका हॉटेलात वेश्या व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने शनिवारी छापा टाकत दोन महिलांसह रॅकेट चालविणाऱ्या करणं नमन यादव उर्फ भोला याला अटक केली. करणने याच परिसरात एका हॉटेलमध्ये २० रूम भाड्याने घेतल्या. त्यासाठी तो महिन्याला ५ लाख भाडे देत होता. या भाड्याच्या रूममध्ये तो वेश्याव्यवसाय चालवत असे. अटक आरोपी करण ऑनलाईन हे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत होता असून त्याचा वाहन चालक संतोष यादव आणि मित्र अशोक यादव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ मोबाईल, १६ हजार रुपये आणि १ कार जप्त केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Prostitution racket was running in 20 rental room; Police bursted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.