वेश्या व्यवसाय सुरु होता लॉजिंगमध्ये, पोलिसांच्या धाडीत उघड झालं पितळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 20:08 IST2020-12-01T20:07:48+5:302020-12-01T20:08:29+5:30
Prostitution : मीरा भाईंदर शहर हे लॉजिंग बोर्डिंग व ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे कुप्रसिद्ध झाले असून ह्या अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या माफियांचे व्यवसाय आणि बांधकामे तोडून टाकण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत.

वेश्या व्यवसाय सुरु होता लॉजिंगमध्ये, पोलिसांच्या धाडीत उघड झालं पितळ
मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मीरा गावठाण येथील माय होम लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचे पोलिसांच्या धाडीत उघड झाले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हनुमान मंदिर लगत असलेल्या माय होम या लॉजिंग बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन पोतदार व पोलीस पथकाने लॉज वर सापळा रचला. वेश्याव्यवसाय साठी वेटर आदींनी पैसे घेतल्या नंतर धाड टाकली असता वेश्याव्यवसाय साठी ठेवलेल्या दोन पीडित मुली आढळून आल्या.
पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका करून चालक शंकर चिंतामण यादव (३७) रा. सेक्टर २, शांती नगर व वेटर बबलू साव (२५) ह्या दोघांना पिटा कायद्याखाली अटक केली आहे. तर लॉजचा चालक किरण मकवाना ह्याला अटक करणे बाकी आहे. मीरा भाईंदर शहर हे लॉजिंग बोर्डिंग व ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे कुप्रसिद्ध झाले असून ह्या अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या माफियांचे व्यवसाय आणि बांधकामे तोडून टाकण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत.