शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

श्रीलंकेत झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 7:29 PM

या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्देपीस टीव्हीच्या सहाय्याने झाकीर नाईक हा तरुणांचे ब्रेनवॉश करतो. भारत व बांग्लादेशने झाकीर नाईकच्या या चॅनेलवर आधीपासूनच बंदी घातली आहेश्रीलंका बॉम्बस्फोटात देखील त्याचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोलंबो - श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोत ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी साखळी बॉम्बस्फोटात २५३ नागरिक ठार झाले तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारने झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी घातली आहे. 

पीस टीव्हीच्या सहाय्याने झाकीर नाईक हा तरुणांचे ब्रेनवॉश करतो. तसेच त्या तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळेच भारत व बांग्लादेशने झाकीर नाईकच्या या चॅनेलवर आधीपासूनच बंदी घातली आहे. श्रीलंका बॉम्बस्फोटात देखील त्याचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोलंबोतील शांगरिला हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याला झाकिर नाईकची भाषणं ऐकायला आवडतं असत. काही दिवसांपूर्वी हाशिमने एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. त्यात त्याने श्रीलंकेतील मुसलमान झाकीर नाईक यांच्यासाठी काय करू शकतात?, असा प्रश्न केला होता. २०१६ साली भारत सरकारने झाकीर नाईक आणि त्याच्या संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. नाईक सध्या मलेशियात लपून बसला आहे. काही वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या हल्लेखोरांकडे नाईक याची भडकाऊ भाषणं आढळून आली होती.

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकsri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोटSri Lankaश्रीलंकाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी