थायलंडमध्ये प्रियांका शर्माच्या मृत्यूप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये प्रियांकाच्या शरीरावर नऊ वेगवेगळ्या ठिकाणी जखमा असल्याचे समोर आले. या जखमा मृत्यूपूर्वी झाल्या होत्या. प्रियांकाच्या शरीरावर डोक्याच्या मागच्या बाजूला, उजव्या हाताला खांद्यापासून कोपरापर्यंत, उजव्या मनगटाभोवती, डाव्या हाताच्या बाहेरील भागात आणि उजव्या पाठीच्या बाजूला जखमा होत्या. या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्टवर घेतलेल्या वैद्यकीय-कायदेशीर मताची पोलिस वाट पाहत आहेत, यामुळे आता हा अहवाल आल्यानंतर मोठा खुलासा होणार आहे.
Mamta Vashishtha: दोन महिन्यापूर्वी झालं लग्न, आता महाकुंभमेळ्यात बनली महामंडलेश्वर!
या प्रकरणात आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीसही या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात व्यस्त आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर संशय आणखी वाढला आहे. सोमवारी कुटुंबाने आयुक्तांची भेट घेतली आणि डॉक्टरच्या अटकेची मागणी केली. डीसीपी पूर्व विभाग शशांक सिंह यांनी सांगितले की, आता वैद्यकीय-कायदेशीर मत घेतले जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
नेमकं प्रकरण काय?
डॉ. आशिष श्रीवास्तव आणि प्रियांका शर्मा हे लखनऊच्या वृंदावन भागात राहत होत्या. दोघांनी २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. प्रियांका पाटणा एम्समध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होत्या, तर आशिष तिथे वरिष्ठ निवासी होता. लग्नानंतर आशिषची पोस्टिंग जालौनमधील ओराई मेडिकल कॉलेजमध्ये झाली.
काही दिवसापूर्वी प्रियांका शर्मा त्यांच्या पती आणि मुलासह थायलंडमधील पटाया शहराला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, हॉटेलमध्ये त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मुलीच्या हत्या केली असा आरोप प्रियांका यांचे वडील सत्यनारायण शर्मा यांनी केला. आशिष यांच्या वर त्यांनी आरोप केले, दरम्यान यावर आशिष याने सांगितले की, प्रियांकाचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला.
प्रियांका शर्मा यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, थायलंडमधील डॉक्टरांनी मृत्यूचे कारण कार्डिओपल्मोनरी फेल्युअर असल्याचे म्हटले आहे, पण त्यांना या अहवालावर विश्वास नाही. प्रियांका यांचे वडील सत्यनारायण शर्मा यांनी आरोप केला आहे की, आशिष याने मुलीची हत्या केली आहे. लग्नापासूनच आशिष त्यांची मुलगी प्रियांकाला त्रास देत होता. त्यांनी आरोप केला की, आशिषचे विवाहबाह्य संबंध होते, याचा प्रियांकाचा विरोध होता. यानंतर आशिषने प्रियांकाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. एवढेच नाही तर प्रियांकाने यापूर्वी आशिषविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली होती, असा खुलासा कुटुंबीयांनी केला.