जालना जिल्हा कारागृहात कैद्याची आत्महत्या;बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात होता अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:21 IST2018-08-27T11:20:47+5:302018-08-27T11:21:29+5:30
तालुक्यातील इंदेवाडी जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जालना जिल्हा कारागृहात कैद्याची आत्महत्या;बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात होता अटकेत
जालना : तालुक्यातील इंदेवाडी जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली. रमेश गणेश हिवाळे (वय.२०, रा. हातवन, ता. जि. जालना) असे कैद्याचे नाव आहे.
रमेश हिवाळे याच्या विरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यात मुलीला पळवून नेऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात तो २१ आॅगस्टपासून न्यायालयाच्या आदेशाने इंदेवाडी कारागृहात होता. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यृची नोंद करण्यात आली असून सध्या पंचनाम सुरु असल्याची माहिती कारागृह निरीक्षकांनी दिली आहे.