खिडकीचे गज कापून कैद्याने केले पलायन, पोलिसांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 07:18 PM2021-07-21T19:18:07+5:302021-07-21T19:18:41+5:30

Crime News : तात्पुरत्या उभारलेल्या कोविडकारागृहातून

The prisoner escaped by cutting the window sill, the police fell asleep | खिडकीचे गज कापून कैद्याने केले पलायन, पोलिसांची उडाली झोप

खिडकीचे गज कापून कैद्याने केले पलायन, पोलिसांची उडाली झोप

Next
ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील सुमारे सत्तर कैद्यांना कोरोनाची नुकतीच लागण झाल्याची घटना घडली होती. 

निखील म्हात्रे                                                                                                                         
 

अलिबाग - गाेंधळपाडा येथे तात्पुरत्या उभारलेल्या कोविड कारागृहातून कैद्याने पलायन केले आहे. या घटनेने कारागृह प्रशासन आणि अलिबाग पाेलिसांची झाेप उडाली आहे. देवा मारुती दगडे वय वर्षे-24 असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव आहे. सदरची घटना बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील सुमारे सत्तर कैद्यांना कोरोनाची नुकतीच लागण झाल्याची घटना घडली होती. 

काेराेना कालावधीत कैद्याना थेट अलिबाग येथील कारागृहात न ठेवता आधी नेहुली येथील क्रीडा संकुलात तात्पुरत्या उभारलेल्या कारागृहात ठेवण्यात येते. या कैद्यांमध्ये देवा मारुती दगडे हा आराेपी हाेता. पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कलम ३६३, ३६६, ३७६, ३२३, ३ अ/४.५ (१) (एन) ६ पाॅस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.दगडे याला १६ जानेवारी २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. १९ जानेवारी २०१८ पासून दगडे हा जिल्हा कारागृहात दाखल होता. २० जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कारागृहाच्या खिडकीचे गज कापून दगडे याने पलायन केले. या आरोपीचे शिक्षण बारावी पर्यंत झालेले आहे. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा दगडे याची उंची १६५ सेंमी आहे. याबाबत कोणासही माहिती मिळाल्यास अलिबाग पोलीस ठाण्याला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, गज कापण्यााठी कैद्याकडे हत्यार काेठून आले. पहाटे अडिज वाजता गज कापत असताना पहारेकरी काय करत हाेते. त्यांच्या साेबत अन्य काेणी सामील आहे का याचाही तपास पाेलिस करत आहेत.           

Web Title: The prisoner escaped by cutting the window sill, the police fell asleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app