शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजगड पोलिसांची ४७० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 18:10 IST

जिल्ह्यातील मतदारसंघांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे.

ठळक मुद्दे२८१ जणांवर १५ दिवसांसाठी,२ वर्षांसाठी ४५ जण तडीपार

नसरापूर : लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी राजगड पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या ४७० गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे. निवडणुकीच्या वेळी गुन्हे दाखल झालेल्यांची वेगळी यादी तयार केली आहे. ४७० गुन्हेगारांपैकी ४५ जणांवर दोन वर्षांसाठी  तर २८१ जणांवर पंधरा दिवसांसाठी तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.      राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत ४५ जणांना दोन वर्षांसाठी  तडीपार करण्यात येणार आहे. या निवडणूक कालावधीत पंधरा दिवसांसाठी २८१ जणावर  तडीपार करण्याचे प्रस्ताव प्रांताधिकारी तहसीलदार आणि पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.   या गुन्हेगारांचा वापर निवडणुकीत होऊ नये म्हणून पोलिसांनी आत्तापासूनच उपाययोजना सुरू केली आहे. रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून, त्यात संशयित गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. दोनपेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. या पुढील काळात कोम्बिंग ऑपरेशन आणखी प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.   आरोपींवरील गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार कोम्बिंग ऑपरेशन किंवा नाकाबंदीत पकडलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत गुन्हेगारांकडून निवडणूक काळामध्ये चांगल्या वागणुकीसाठी प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईतांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर मोक्का किंवा एमपीडीएची कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. आगामी निवडणुका आणि प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक