लज्जास्पद! घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 16:49 IST2018-10-13T16:33:14+5:302018-10-13T16:49:48+5:30
बुधवारी रात्री 28 वर्षीय गर्भवती महिला घरी एकटी होती. दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने तिला आपला पती आला असे समजून तिने दरवाजा उघडला. मात्र, दरवाजा उघडताच तीन नराधम घरात जोरजबरदस्तीने घुसले आणि एकट्या गरोदर महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

लज्जास्पद! घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार
कोलकाता - पश्चिम बंगालमधील आसनसोल शहरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची भयानक घटना घडली आहे. बुधवारी रात्री 28 वर्षीय गर्भवती महिला घरी एकटी होती. दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने तिला आपला पती आला असे समजून तिने दरवाजा उघडला. मात्र, दरवाजा उघडताच तीन नराधम घरात जोरजबरदस्तीने घुसले आणि एकट्या गरोदर महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.
पीडित महिलेचा पती मोटार मॅकॅनिकचे काम करतो. तो रात्री घरी आल्यावर पत्नी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्याने पत्नीला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. महिला शुद्धीवर आल्यावर तिने घडलेला प्रसंग सांगितला. वैद्यकीय अहवालात पीडितेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडित महिलेने एक आरोपी स्थानिकच असून त्याचे नाव कुलदीप सिंग असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून एका आरोपीची ओळख पटली असून आरोपींचा शोध सुरू असल्येचे आसनसोलचे पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण मीणा यांनी सांगितले आहे.