Pregnant woman kills husband after he compels her to have sexual relationship | गर्भवती पत्नीने पतीची केली हत्या, शरीरसंबंधास नकार दिल्याने देत होता त्रास...

गर्भवती पत्नीने पतीची केली हत्या, शरीरसंबंधास नकार दिल्याने देत होता त्रास...

Pregnant Woman Kills Husband :: तामिळनाडूच्या(Tamilnadu) ईरोडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे ५ महिन्यांच्या गर्भवती पत्नीने आपल्या पतीची हत्या (Pregnant Woman Kills Husband) केली. कारण तो तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध (Forced Sexual Relationship) ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा पुन्हा दबाव टाकल्याने पत्नी संतापली आणि रागात तिने पतीची हत्या केली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

पतीची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने पोलिसांकडे जाऊन सरेंडर केलं. आरोपी महिलेने सांगितले की, तिने तिच्या पतीच्या जेवणात कीटकनाशक मिश्रित करून त्याला खायला दिलं. त्याने त्याचा मृत्यू झाला. आरोपी महिलेचं नाव मैथिली असून तिचं लग्न मृत नंद कुमारसोबत ८ महिन्यांआधीच झालं होतं. पाच महिन्यांआधी महिला गर्भवती झाली होती. (हे पण वाचा  : Girlfriend ने बॉयफ्रेन्डवर चाकू अन् हातोड्याने केला जीवघेणा हल्ला, कारण वाचून चक्रावून जाल...)

नंद कुमार हा शेतीचं काम करत होता. नंद कुमारचं मैथिलीसोबत दुसरं होतं. आरोपीनुसार, ५ महिन्यांची गर्भवती असूनही नंद कुमार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करत होता. जेव्हा तिने नकार दिला तर तो तिला त्रास देऊ लागला होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या २८ जानेवारीला आरोपी महिलेने आपल्या पतीला जेवणातून विष दिलं. ज्यानंतर ३ दिवसांनी ३१ जानेवारीला पीडित व्यक्तीला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर १६ दिवसांच्या उपचारानंतर नंद कुमारचं निधन झालं. (हे पण वाचा : विद्यार्थ्यानं वर्गातच झाडली मित्रावर गोळी, नंतर गर्लफ्रेन्डच्या घरी जाऊन तिचीही केली हत्या)

याप्रकरणी पोलीस अधिकारी एस.रवि यांनी सांगितले की, नंद कुमारने १५ जानेवारीला हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ज्यानंतर हॉस्पिटलने पोलिसांनी सूचना दिली. नंतर गेल्या शुक्रवारी आरोपी महिला मैथिलीने सरेंडर केलं. यानंतर कोर्टाने मैथिलीला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.
 

Web Title: Pregnant woman kills husband after he compels her to have sexual relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.