महाठग प्रीतीने वर्धेच्या मित्रालाही सोडलं नाही; दीड लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 23:01 IST2020-06-13T23:01:29+5:302020-06-13T23:01:44+5:30

काही दिवसांनी प्रीतीचे वर्तन लक्षात आल्यामुळे आणि नोकरी लावून देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे नवलेने तिला आपली रक्कम परत मागितली

Preeti das did not leave Wardha's friend; One and a half lakh was fraud | महाठग प्रीतीने वर्धेच्या मित्रालाही सोडलं नाही; दीड लाख हडपले

महाठग प्रीतीने वर्धेच्या मित्रालाही सोडलं नाही; दीड लाख हडपले

 नागपूर : महाठग प्रीती दास हिने वर्धेच्या तिच्या एका मित्रालाही ठगविल्याचे उघड झाले आहे. नवल राधेश्याम पांडे (वय २९) नामक तरुणाने आज प्रीती विरुद्ध तक्रार नोंदविली. त्यावरुन सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ठगबाज प्रीतीविरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. प्रीतीने नवल पांडे याच्या सोबत मैत्री करून त्याला त्याची संपूर्ण माहिती विचारली. नंतर त्याला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून वर्षभरापूर्वी दीड लाख रुपये घेतले.

काही दिवसांनी प्रीतीचे वर्तन लक्षात आल्यामुळे आणि नोकरी लावून देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे नवलेने तिला आपली रक्कम परत मागितली. त्याने तिच्या मागे तगादा लावल्यामुळे तिने त्याला ३० हजार रुपये परत केले. मात्र एक लाख, २० हजार रुपये देण्यास टाळाटाळ करीत होती. प्रीतीविरुद्ध नागपुरात गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त कळाल्यानंतर नवलने सीताबर्डी पोलिस ठाण्यात येऊन शनिवारी आपली तक्रार नोंदविली. त्यामुळे पोलिसांनी प्रीतीदास विरुद्ध रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Preeti das did not leave Wardha's friend; One and a half lakh was fraud