महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून लपून बसलेल्या कोरटकरच्या तेलंगणात मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 05:49 IST2025-03-25T05:48:38+5:302025-03-25T05:49:28+5:30

महिनाभर पोलिसांना गुंगारा; कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द

Prashant Koratkar who was absconding after making objectionable statements about Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj is arrested in Telangana | महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून लपून बसलेल्या कोरटकरच्या तेलंगणात मुसक्या आवळल्या

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून लपून बसलेल्या कोरटकरच्या तेलंगणात मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकाविणारा प्रशांत कोरटकर (रा. नागपूर) याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनपासून त्याला सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात २५ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता.

कोल्हापूर पोलिसांनी महिनाभरात नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदौर येथे त्याचा शोध घेतला. तो एका वाहनातून तेलंगणात गेल्याचे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मिळताच पोलिसांनी तेलंगणात तपास सुरू केला होता. अखेर मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनजवळ तो पोलिसांच्या हाती लागला. सोमवारी दुपारी अटकेची प्रक्रिया सुरू केली. त्याला आश्रय देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

महिनाभर पोलिसांना गुंगारा

गुन्हा दाखल होताच पसार कोरटकरने पोलिसांना महिनाभर गुंगारा दिला. या काळात त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळवला. पोलिस आणि सरकारी वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर त्याचा अंतरिम जामीन रद्द झाला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सोमवारी सायंकाळी चार वाजता सुनावणी होणार होती. तत्पूर्वीच अटक झाल्याने कोर्टाने त्याचा अर्ज रद्द केला.

Web Title: Prashant Koratkar who was absconding after making objectionable statements about Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj is arrested in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.