Posters of wanted terrorists everywhere, Republic Day attack threat | वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका 

वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका 

ठळक मुद्देठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. 

देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन येत्या २६ जानेवारीला असून या दिनी दहशतवादी घातपाती हल्ला करण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी कंबर कसून अधिकच सतर्कता बाळगली आहे. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. 


दिल्ली पोलिसांकडून संशयित दहशतवाद्यांची शोधमोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या सिंघूसारख्या दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकाऱ्यांच्या आंदोलनात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत २६ जानेवारीला दहशतवादी कारवाई घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेसचे एसीपी सिद्धार्थ जैन यांनी खलिस्तानी आणि अल कायदासह काही दहशतवादी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनीच्या दिवशी घातपाताची स्थिती निर्माण केली जाऊ शकतो, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून आम्ही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यासह काही पावलं उचचली आहेत, अशी माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सारख्या देशाच्या महत्वाच्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेसमोर दहशतवादाचे सावट असतेच त्याला पोलीस सामर्थ्याने सामोरे जातात. 

 

मायानगरी मुंबई देखील अलर्ट 

२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन आणि मुंबईला दहशतवादी हल्ल्याच्या मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्था पाहता खबरदारीचा उपाय म्हणून गृह विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३१ डिसेंबर 2020 ते २९ जानेवारी २०२१ या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश काढण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भा. दं. वि . कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल. 

 

Web Title: Posters of wanted terrorists everywhere, Republic Day attack threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.