कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:40 IST2022-06-03T17:38:07+5:302022-06-03T17:40:00+5:30
Karti Chidambaram : ११ वर्षे जुन्या प्रकरणात सीबीआयने कार्तीची चौकशीही केली होती.

कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि खासदार कार्ती चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे कार्ती यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
गेल्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वकिलांनी म्हटले होते की, अंतरिम जामीन मंजूर झाल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो, पैसे कुठे गेले हे शोधणे आम्हाला शक्य होणार नाही? पीएमएलएचा तपास हा गुन्ह्याच्या प्रमाणात मर्यादित नाही कारण एफआयआरमध्ये इतर व्यवहार असू शकतात असे म्हटले आहे. ही रक्कमही कोटींच्या पुढे जाऊ शकते.
कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक
ईडीने कार्तीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करत म्हटले की, मनी लाँड्रिंग आणि बनावट व्हिसाचे आरोप गंभीर आहेत आणि या प्रकरणात कार्तीचे युक्तिवाद कमकुवत आणि मुदतपूर्व आहेत. त्यांच्यावर विसंबून राहणे धोक्याचे ठरेल आणि तपासाला धक्का बसेल.११ वर्षे जुन्या प्रकरणात सीबीआयने कार्तीची चौकशीही केली होती. ज्याला काँग्रेस नेत्याने "बनावट" आणि "राजकीय सूडबुद्धीचा परिणाम" असे म्हटले आहे. हे प्रकरण 2011 चे आहे, जेव्हा कार्तीचे वडील पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते.