PMC बँकेसंदर्भातील याचिकेवर २ आठवड्यांनी सुनावणीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 21:54 IST2019-10-03T21:52:22+5:302019-10-03T21:54:00+5:30
कर्जवाटप घोटाळ्यांविरोधात स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची याचिकेत मागणी करण्यात आली होती.

PMC बँकेसंदर्भातील याचिकेवर २ आठवड्यांनी सुनावणीची शक्यता
मुंबई - PMC बँकेसंदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. दोन आठवड्यांनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. आरबीआयने लावलेल्या निर्बंधांविरोधात मुंबईउच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. कर्जवाटप घोटाळ्यांविरोधात स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची याचिकेत मागणी करण्यात आली होती.
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आरबीआयने बँकेवर लादलेले निर्बंध तात्काळ हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेत आर्थिक गैरव्यवहार झालेली ही काही पहिली बँक नसून आरबीआयने असे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी असे नमूद असून उद्या मंगळवारी हायकोर्टात याचिका सादर होणार आहे. कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क या संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली आहे.