Pornhub वेबसाइटला मोठा झटका; Video वरून ३४ महिलांनी दाखल केला खटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 10:45 AM2021-06-19T10:45:46+5:302021-06-19T10:46:02+5:30

पॉर्न हब वेबसाईट मुद्दामहून बलात्कार आणि अल्पवयीनांसंबंधी तसेच महिलांसोबतच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ लोकांना दाखवून पैसे कमावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Pornhub website: 34 women file lawsuit over there sex video's | Pornhub वेबसाइटला मोठा झटका; Video वरून ३४ महिलांनी दाखल केला खटला

Pornhub वेबसाइटला मोठा झटका; Video वरून ३४ महिलांनी दाखल केला खटला

Next

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठ्या पॉर्न वेबसाईटमध्ये असलेली पॉर्न हब (Pornhub) आणि तिची मूळ कंपनी माइंटगीकला (MindGeek) मोठा झटका बसला आहे. अमेरिकेसह जगभरातील ३४ महिलांनी पॉर्नहब विरोधात कॅलिफोर्नियामध्ये खटला दाखल केला आहे. पॉर्न हब वेबसाईट मुद्दामहून बलात्कार आणि अल्पवयीनांसंबंधी तसेच महिलांसोबतच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ लोकांना दाखवून पैसे कमावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Pornhub and its parent company, MindGeek, are being sued by over a dozen women who allege the site intentionally monetized videos depicting rape, child sexual exploitation)

पॉर्न हब अल्पवयीनांचे व्हिडीओ आणि परवानगी नसताना अनेक महिलांचे अश्लिल व्हिडीओ पोस्ट करणारा एक बाजार बनला आहे. कंपननी याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या महिलांनी केल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे. या महिलांनुसार पॉर्नहब चालविणारी कंपनी माइंडगीक ही अॅडल्ट एंटरटेनमेंटच्या नावाखाली गुन्हेगारी साम्राज्य चालवत आहे. 

माइंडगीकचे बिझनेस मॉडेल हे बिना सहमतीने बनविण्यात आलेल्या शरीर संबंधांविषयावर आधारित आहे. हा प्रकार बलात्काराचा आहे. पॉर्नोग्राफीचा नाही. या प्रकरणी खटला दाखल करणाऱ्या या महिलांपैकी एकीनेच आपली ओळख उघड केली आहे. या तक्रारदार महिलांमध्ये परदेशातील महिला देखील आहे. १४ महिलांनी सांगितले की, जेव्हा त्या अल्पवयीन होत्या, तेव्हा त्यांचे व्हिडीओ बनविण्यात आले. यामुळे हा अल्पवयीनांचे यौन शोषणसंबंधी गुन्हा आहे. 

वकील मायकल बोवे यांना सांगितले की, न्यायालय या महिलांना लाखो डॉलरची नुकसान भरपाई देण्यास कंपनीला भाग पाडू शकेल. एका महिलेचे नाव सेरेना फ्लेइटस आहे. तिने सांगितले की, २०१४ मध्ये मला समजले की माझ्या बॉयफ्रेंडसोबतचा न्यूड व्हिडीओ तिच्या परवानगीशिवाय पॉर्नहबवर टाकण्यात आला आहे. तेव्हा मी फक्त १३ वर्षांची होते. सेरेनाने जेव्हा याची तक्रार पॉर्नहबकडे केली तेव्हा कित्येक आठवड्यांनी तो व्हिडीओ हटविण्यात आला. तोवर त्याद्वारे पैसे कमावून घेतले होते. ( Dozens of women are suing Pornhub alleging it shared nonconsensual sex videos.)

Web Title: Pornhub website: 34 women file lawsuit over there sex video's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app