फॅन असल्याचे सांगत लेखिकेला पाठविला अश्लील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 00:14 IST2019-03-22T00:14:10+5:302019-03-22T00:14:41+5:30

फॅन असल्याचे लेखिकेबरोबर फेसबुकवर मैत्री करुन मेसेंजरवर अश्लिल व्हिडिओ पाठविण्याचा प्रकार समोर आला आहे.

Porn video to be sent to fan | फॅन असल्याचे सांगत लेखिकेला पाठविला अश्लील व्हिडिओ

फॅन असल्याचे सांगत लेखिकेला पाठविला अश्लील व्हिडिओ

पुणे - फॅन असल्याचे लेखिकेबरोबर फेसबुकवर मैत्री करुन मेसेंजरवर अश्लिल व्हिडिओ पाठविण्याचा प्रकार समोर आला आहे. या लेखिकेच्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी राजेश देशमुख (रा़ अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ व १८ मार्च रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या प्रसिद्ध लेखिका असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राजेश याने आपण तुमचे फॅन असल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना पुस्तके पाठविण्याची विनंती केली. आपल्या लेखनाचा चाहता असल्याचे वाटून त्यांनी त्याला काही पुस्तके पाठविली. त्यानंतर तो फेसबुकवर त्यांच्याशी बोलू लागला. काही दिवसांनी फेसबुक मेसेंजरवर त्याने ‘हाय ब्युटीफुल’ असा मेसेज पाठवला. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो मेसेज डिलिट केला. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांना फेसबुक मेसेंजरवर एक अश्लील व्हिडीओ पाठवला. या व्हिडीओनंतर लेखिकेने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी राजेश देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस निरीक्षक एस. एस. खटके अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Porn video to be sent to fan