व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कुंद्रा चालवायचा पोर्न रॅकेट; २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 05:55 IST2021-07-21T05:54:44+5:302021-07-21T05:55:21+5:30

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेपाठोपाठ कुंद्रा याच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे.

porn racket runs raj kundra through whatsapp | व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कुंद्रा चालवायचा पोर्न रॅकेट; २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कुंद्रा चालवायचा पोर्न रॅकेट; २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेपाठोपाठ कुंद्रा याच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात कुंद्रा हा पोर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, व्हॉट्सॲपवरून याचे कामकाज सांभाळत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात मालमत्ता कक्षाने आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशीत कुंद्रा कनेक्शन उघडकीस आले. कामत हा कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कामतने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत, लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे असून, ते राज कुंद्रा  याचे नातेवाईक आहेत.

ॲपवरून आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण

- कुंद्राने हॉटशॉटच्या कामकाजासाठी ‘एचसी टेक डाउन’, ‘एचसी अकाउंट’ आणि ‘एचसी ऑपरेशन’ हे ३ व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले होते. या ग्रुपवरून राज कुंद्रा सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होता. 

- हॉटशॉट्स ॲपद्वारे प्रसारित होणाऱ्या फिल्मचे कन्टेन्ट, कलाकारांना द्यावयाचे मानधन, ॲपद्वारे मिळणारे उत्पन्न याबाबत कुंद्रा सूचना देत असल्याचे आढळले.      
 

Web Title: porn racket runs raj kundra through whatsapp