शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे बनावट फेसबुक अकाउंटवर अश्लील मेसेज; अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घेतली गंभीर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:50 IST

नौपाडा पोलीस ठाण्यात महिलांच्या विविध समस्यांच्या तक्रारीचा मंगळवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आढावा घेतला.

ठाणे - नौपाडा पोलीस ठाण्यात महिलांच्या विविध समस्यांच्या तक्रारीचा मंगळवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आढावा घेतला. महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींदरम्यान एका तरुणीचे बनावट फेसबुक अकाउंट सुरु करून त्यावरून अश्लील मेसेज करण्याचे प्रकरण पुढे आले. या तक्रारीबाबत अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी गंभीर दखल घेत प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश संबंधित पोलिसांना  देण्यात आले आहेत. 

नौपाडा पोलीस ठाण्यातील महिलांनी केलेल्या तक्रारीच्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासोबत पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय साळगावकर, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ चंद्रकांत जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ यांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीत महिलांनी तक्रारींबाबतची माहिती दिली. त्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा जाब अतिरिक्त आयुक्तांनी विचारला. दरम्यान, पोलीस ठाण्यात दाखल एका तरुणीच्या नावाने बोगस अकाऊंट उघडून अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्याच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आणि गंभीरतेने हाताळण्याचे आदेश दिले. त्यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी अश्लील पोस्टचे काढलेले फोटोही अतिरिक्त आयुक्त सत्यनाराण चौधरी यांना दाखविले.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेFacebookफेसबुकWomenमहिलाPoliceपोलिस