Police's children felicitated by Thane Police Commissioner | पोलिसांच्या पाल्यांचा ठाणे पोलीस आयुक्तांकडून सत्कार
पोलिसांच्या पाल्यांचा ठाणे पोलीस आयुक्तांकडून सत्कार

ठळक मुद्देअपर पोलीस आयुक्त कराळे यांच्या संकल्पनेतुन करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमात सुमारे 400 पोलीस पाल्य आणि कुटुंबीय हजर होते. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे तसेच पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे उपस्थित होते.

कल्याण - विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या पोलिसांच्या पाल्यांचा सत्कार पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पूर्व प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या परिमंडळ 3 आणि परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या 16 पोलीस ठाण्यामधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार कल्याणात आयोजित करण्यात आला होता. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे तसेच पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे उपस्थित होते. यावेळी, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त फणसळकर यांनी  प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.  अपर पोलीस आयुक्त कराळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमात सुमारे 400 पोलीस पाल्य आणि कुटुंबीय हजर होते. तसेच विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्व पोस्ट प्रभारी अधिकारी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाची माहिती आणि रुपरेषा सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी तर सुत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी केले.


Web Title: Police's children felicitated by Thane Police Commissioner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.