लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 10:26 AM2021-06-17T10:26:02+5:302021-06-17T10:29:25+5:30

काही कळायच्या आत पोलीस नवरदेवाला मंडपातून उचलतात आणि घेऊन जातात. नवरीला याचा धक्का बसतो आणि ती घरात परत जाते.

Police took away the groom from the mandap in Paliganj Patna Bihar | लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न

लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न

Next

ते म्हणतात ना जोड्या देवाघरीच तयार झालेल्या असतात. अशीच एक घटना बिहारच्या मोरारचकमध्ये बघायला मिळाली. नवरदेव मंडपात बसला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नवरी लाजत मंडपात येत होती. तेव्हाच मंडपात पोलिसांची एन्ट्री झाली. काही कळायच्या आत पोलीस नवरदेवाला मंडपातून उचलतात आणि घेऊन जातात. नवरीला याचा धक्का बसतो आणि ती घरात परत जाते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १५ जून रोजी बिहारच्या मोरारचक गावात घडली. काही वेळातच या घटनेची माहिती गावात पसरली. अशात गावात पंचायत बोलवली जाते आणि तेव्हा ठरतं की, नवरीचं लग्न नवरदेवाच्या छोट्या भावासोबत लावून द्यावं. पंचायतचा हा निर्णय वराती आणि घरातील लोक मान्य करतात. घाईघाईत नवरदेवाच्या लहान भावाला तयार केलं जातं आणि त्याच मंडपात नवरीसोबत त्याचं लग्न लावून दिलं जातं. (हे पण वाचा : घरातून पळून गेलेल्या मुलीला समजली प्रियकराच्या पगाराची रक्कम, ऐनवेळी लग्नास दिला नकार)

काय आहे प्रकरण?

संजय यादवचा मुलगा अनिल कुमारचं लग्न मुरारचक गावातील भीम यादवच्या मुलीसोबत ठरलं होतं. सर्व कार्यक्रम ठरल्यानुसार पार पडत होते. १५ जूनला वरात पोहोचली तर त्यांचा चांगला मान-सन्मान करण्यात आला. दुसरीकडे अनिलच्या पहिल्या पत्नीला जसं समजलं की, त्याचं दुसरं लग्न होत आहे. ती पोलिसांकडे केली आणि हे लग्न रोखण्याची विनंती केली. तिने अनिलसोबत तिच्या लग्नाचा फोटोही पोलिसांना दाखवा. त्यानंतर पोलिसांनी महिलेची साथ दिली.

नवरदेवाचं आधीच झालं होतं लग्न

अशात गावाचे प्रमुख अशोक य़ादव यांना पोलिसांचा फोन आला. त्यांनी यादव यांना सांगितलं की, तुमच्या गावात जी वरात आली आहे तो मुलगा आधीच विवाहित आहे. त्याची पत्नी आमच्याकडे आली आहे. तुम्ही जाऊन लग्न थांबवा. आम्ही येतोय. अशोक यादव यांनी नवरीच्या वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून त्यांनही धक्का बसला. गावातही ही खबर आगीसारखी पसरली. अशात अनिकची पहिली पत्नी पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली. 

नवरदेवाच्या भावासोबत नवरीचं लग्न

महिलेने सांगितलं की, एक वर्षाआधीच आम्ही लग्न केलं आहे. पोलीस नवरदेवाला घेऊन पोलीस स्टेशनमद्ये गेले. त्यानंतर गावकऱ्यांनी वरातीत आलेल्या लोकांना बंदी बनवलं. अशात गावाच्या प्रमुखांनी यात मार्ग काढण्याचा विषय काढला. बरीच चर्चा झाल्यावर ठरलं की, नवरीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावासोबत लावून दिलं जावं. दोन्हीकडील लोकांच्या उपस्थितीत सकाळी दोघांचं लग्न लावण्यात आलं. तेव्हा प्रकरण शांत झालं. तर अनिलकडून पोलिसांनी लिहून घेतलं की, तो त्याच्या पत्नीचा सांभाळ करेल. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही सोडून दिलं.

Web Title: Police took away the groom from the mandap in Paliganj Patna Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.