१३ वर्षीय मुलाची क्रूर हत्या, शिर धडापासून वेगळं केलं अन्...; समोरील भयानक दृश्य पाहून पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:18 IST2021-07-20T14:16:40+5:302021-07-20T14:18:30+5:30

ही घटना दक्षिण फ्रान्सच्या टारस्कॉन येथील एका इमारतीत घडली आहे. पोलिसांनी रविवारी सकाळी या इमारतीतून १३ वर्षीय मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला.

Police shoot man suspected of beheading boy and eating part of his head | १३ वर्षीय मुलाची क्रूर हत्या, शिर धडापासून वेगळं केलं अन्...; समोरील भयानक दृश्य पाहून पोलिसही चक्रावले

१३ वर्षीय मुलाची क्रूर हत्या, शिर धडापासून वेगळं केलं अन्...; समोरील भयानक दृश्य पाहून पोलिसही चक्रावले

ठळक मुद्देपोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मृत मुलाचं शीर एका बादलीत आढळलं. काही तासानंतर पोलिसांना या व्यक्तीचा शोध लागला तो जवळच्या एका परिसरात राहत होता. आरोपीवर गोळी त्यावेळी चालवली जेव्हा तो एका घराच्या छतावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करत होता.

दक्षिण फ्रान्समधील अत्यंत क्रूर अशी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका आरोपीनं १३ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केली. या मुलाचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं. त्यानंतर डोक्याचा काही भाग कच्चा खाल्ला आणि उरलेला भाग फेकून दिला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि हे भयानक दृश्य पाहून सगळ्यांचे डोळे चक्रावले.

ही घटना दक्षिण फ्रान्सच्या टारस्कॉन येथील एका इमारतीत घडली आहे. पोलिसांनी रविवारी सकाळी या इमारतीतून १३ वर्षीय मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. मुलाच्या मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे पसरले होते हे पाहून पोलीस हैराण झाले. धडापासून शीर वेगळं केले होते आणि एक हात कापला होता. मिररच्या वेबसाईटनुसार, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मृत मुलाचं शीर एका बादलीत आढळलं. यातील काही भाग चघळल्याचंही दिसून आलं.

ज्या घरात लहान मुलाचा मृतदेह मिळाला ते घर ३२ वर्षीय व्यक्तीच्या नावावर आहे. घटनेनंतर पोलिसांनी घरमालकाचा शोध सुरू केला. काही तासानंतर पोलिसांना या व्यक्तीचा शोध लागला तो जवळच्या एका परिसरात राहत होता. जेव्हा पोलीस या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोहचली तेव्हा पोलिसांना पाहून तो पळू लागला. या संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात एक गोळी संशयिताला लागली. गोळीबारीत त्याचा मृत्यू झाला.

रिपोर्टनुसार, आरोपीवर गोळी त्यावेळी चालवली जेव्हा तो एका घराच्या छतावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान पोलिसांकडून आरोपीची पुष्टी करण्यात आली नाही. हा आरोपी मानसिक आजारी असल्याचं कळालं. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला तेव्हा काही आक्षेपार्ह गोष्टीही आढळल्या. मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरात लोकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. मात्र क्रूर घटना पाहून पोलिसही हैराण झाले आहेत.

Web Title: Police shoot man suspected of beheading boy and eating part of his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस