Police seize Cinestyle 4 lakh gambling near Mozari Crimes filed against 16 accused including 10 two-wheelers. | मोझरीनजीक पोलिसांनी सिनेस्टाईल पकडला 4 लाखाचा जुगार, 10 दुचाकीसह 16 आरोपींवर गुन्हे दाखल

मोझरीनजीक पोलिसांनी सिनेस्टाईल पकडला 4 लाखाचा जुगार, 10 दुचाकीसह 16 आरोपींवर गुन्हे दाखल

- सूरज दाहाट
तिवसा/अमरावती  - पडीक असलेल्या एका शेतशिवारात तिवसा पोलिसांनी धाड टाकून 16 आरोपींना ताब्यात घेत 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.25 जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडीच्या मागील बाजूला एका शेतशिवारात जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार दुपारी 12 वाजता पासून तिवसा पोलिसांचे पथक जुगार खेळणाऱ्या परिसरात सापळा रचून होते.त्यानंतर दुपारी 5 वाजता अतिशय शिताफीने जुगारस्थळी रेस्क्यू करीत जुगारावर धाड टाकली व घटनास्थलावरून एकूण 16 आरोपींसह 10 मोटर सायकल,मोबाईल व नगदी असा एकूण 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.घटनास्थळवरून 4 आरोपी फरार झाले असून एकूण 20 आरोपींवर तिवसा पोलिसांनी जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे.

आरोपीमध्ये तिवसा,माहुली जहागीर,मोझरी येथील जुगाऱ्यांचा समावेश आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश मस्के,नापोका अरविंद गावंडे,पोकॉ मंगेश साव, विशाल करूले,भूषण चंदेल,भूषण नंदरधने, राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: Police seize Cinestyle 4 lakh gambling near Mozari Crimes filed against 16 accused including 10 two-wheelers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.