परभणी शहरात पोलिसांनी जप्त केले 64 लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 16:27 IST2019-10-29T16:26:00+5:302019-10-29T16:27:08+5:30

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका कारमधून 64 लाख 9 हजार 200 रुपयांची रक्कम जप्त केली.

Police seize 64 lakh in Parbhani city | परभणी शहरात पोलिसांनी जप्त केले 64 लाख 

परभणी शहरात पोलिसांनी जप्त केले 64 लाख 

परभणी : परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका कारमधून 64 लाख 9 हजार 200 रुपयांची रक्कम जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात पोलिसांचे एक पथक सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एक क्रियेटा  कार दाखल झाली. या कारची तपासणी केली असता, कारमध्ये एक पोते आढळून आले. त्या पोत्याची पाहणी केली, असता त्यामध्ये 64 लाख 9 हजार 200 रुपयांची रक्कम दिसून आली. यावेळी कारमधील पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 5 जणांना नानलपेठ पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी मोहम्मद सलीम मोहम्मद युसुफ अन्सारी, विठ्ठल सोनाजी नंद, मोहम्मद कयूम अन्सारी, सय्यद जियाउद्दिन, मोहम्मद इरफान या पाच जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पाचही आरोपीना परभणी येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Police seize 64 lakh in Parbhani city