नवी मुंबईतून ७० किलो गांजा पोलिसांनी केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 22:04 IST2019-09-26T22:02:46+5:302019-09-26T22:04:35+5:30
एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

नवी मुंबईतून ७० किलो गांजा पोलिसांनी केला जप्त
ठळक मुद्दे हा गांजा जप्त करून संबंधितांना ताब्यात घेतले आहे. मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा वाहतूक होत असताना कारवाई करून तो जप्त करण्यात आला.
नवी मुंबई - एपीएमसी आवारात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ एकचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा वाहतूक होत असताना कारवाई करून तो जप्त करण्यात आला. सदर साठा 70 किलो असल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार हा गांजा जप्त करून संबंधितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.