हवाला रॅकेट चालवणारा ५३ वा आरोपी लागला पोलिसांच्या गळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:35 IST2018-10-15T15:34:46+5:302018-10-15T15:35:09+5:30
उस्मान या टोळींना संभाळत असल्याचं म्हणजेच तो म्होरक्या असल्याचे पुढे आल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, उस्मान परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शनिवारी त्याला पोलिसांनी विमानतळावर बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील उस्मान हा महत्त्वाचा आणि ५३ वा आरोपी आहे.

हवाला रॅकेट चालवणारा ५३ वा आरोपी लागला पोलिसांच्या गळाला
मुंबई - परदेशात नागरिकांना पाठवून हवाला रॅकेट चालवणाऱ्या वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळण्यास सहार पोलिसांना यश आलं आहे. उस्मान गणी आबूबकर मन्सुरी असं या आरोपीचं नाव असून महत्वाचे म्हणजे या गुन्ह्यातील हा ५३ वा आरोपी आहे. हा आरोपी या टोळीचा म्होरक्या देखील आहे. याआधी या टोळीतील ५२ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणातील अन्य दोन मुख्य आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अटक आरोपी उस्मान आणि त्याच्या साथीदारांना चित्रपट चित्रीकरणाच्या नावाखाली डोंगरी, मानखुर्द यांसारख्या भागातील नागरिकांना परदेशात पाठवून त्यांना त्या ठिकाणी पैसे पुरवून स्वस्त असलेल्या वस्तू (सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रिनिक वस्तू आदी ) खरेदी करण्यास सांगून त्या वस्तू भारतात आल्यानंतर त्यांच्याकडून त्या वस्तू घेऊन त्यांची विक्री करून पैसे कमवायचे.या प्रत्येक परदेशी प्रवासामागे या नागरिकांना मोबदला स्वरुपात पैसे देण्यात येत होते. या सक्रीय टोळीची माहिती काही महिन्यांपूर्वी पोलिसांना मिळाल्यानंतर या टोळीतील ११ जणांना पोलिसांनी आंतराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. त्याच्या चौकशीतून अनेकांची नावं पुढे आली. त्यात उस्मान या टोळींना संभाळत असल्याचं म्हणजेच तो म्होरक्या असल्याचे पुढे आल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, उस्मान परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शनिवारी त्याला पोलिसांनी विमानतळावर बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील उस्मान हा महत्त्वाचा आणि ५३ वा आरोपी आहे.