जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल
By आशपाक पठाण | Updated: August 20, 2023 17:19 IST2023-08-20T17:19:31+5:302023-08-20T17:19:54+5:30
तसेच १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल
आशपाक पठाण/ लातूर
उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील नळगीर येथील महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीखाली तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना वाढवणा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी रोख रकमेसह एकुण ८७ हजार ६५० रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. तसेच १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
वाढवणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उदगीर तालुक्यातील नळगीर शिवारातील महादेव मंदिराच्या पाठीमागे ओढ्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या टाकी खालील खोलीमध्ये बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रोख रक्कम ७ हजार ७४० व १२ मोबाईल असा एकूण ८७ हजार ६५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी इकरम उजेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.