खाकीला काळिमा! लग्नाचं आमिष दाखवून पोलीसाने केला होमगार्डवर बलात्कार
By पूनम अपराज | Updated: November 13, 2018 20:38 IST2018-11-13T20:37:07+5:302018-11-13T20:38:41+5:30
आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी लोकमतला दिली. या पोलीस शिपायाचं नाव नितीन पवार (वय ३६) असं आहे.

खाकीला काळिमा! लग्नाचं आमिष दाखवून पोलीसाने केला होमगार्डवर बलात्कार
मुंबई - लग्नाचं आमिष दाखवून एका पोलीस शिपायाने होमगार्डवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी लोकमतला दिली. या पोलीस शिपायाचं नाव नितीन पवार (वय ३६) असं आहे. पोलिसानेबलात्काराचे कृत्य केल्याने खाकीला काळिमा लावला आहे.
मुलुंड पोलीस ठाण्यात नितीन पवार हा पोलीस शिपाई म्हणून गेली दोन वर्षांपासून कार्यरत असून तो कल्याण परिसरात राहतो. बंदोबस्तादरम्यान त्याची ३४ वर्षीय होमगार्डसोबत ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर मैत्री प्रेमात बदलली. नितीन पवार आणि पीडित होमगार्ड हे दोघे देखील घटस्फोटित आहेत. घटस्फोटित नितीन पवारने होमगार्डल लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी होमगार्डला नितीनने दुसऱ्याच महिलेशी लग्न केल्याचे कळाले. नंतर पीडित होमगार्डला आपली फसवणूक झाल्याचे समजताच होमगार्डने मुलुंड पोलीस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. भा. दं. वि. कलम ३७६, ४२०, ५०६ अन्वये नितीन पवारविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, ६ नोव्हेंबर अगोदरपासूनच नितीन मुलुंड पोलीस ठाण्यात कामावर आले नसून गुन्हाच्या तपास सुरु असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.