खळबळजनक! पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी; चोर निघाला पोलिसाचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 21:08 IST2018-12-05T21:08:12+5:302018-12-05T21:08:51+5:30
या मुलाने ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

खळबळजनक! पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी; चोर निघाला पोलिसाचा मुलगा
जळगाव - पोलिसांच्या घरी चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलिसाचा मुलगा असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जळगाव येथे एका पोलिसाच्या मुलाने घरफोडी केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या मुलाने ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.