लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गरीब व गरजू लोकांना हेरायचे. त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली मोबाइल खरेदी करायचा. पुढे हे मोबाइल विकून पैसे मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत फसवणूक करणाऱ्या सोनू बाबा पीर मोहम्मद (३६) याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबईचा रहिवासी असलेला सोनू कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करायचा. सायन परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तक्रारदार महिलेला ८० हजार रुपये कर्जाची गरज होती. आरोपीने त्यांच्या पतीची कागदपत्रे तपासून त्यांना दीड लाखापर्यंत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी सोनूने महिलेला कागदपत्रांसह धारावी येथील मोबाइल दुकानात बोलावले होते.
सायन, डोंगरी अन् धारावीत १५हून अधिक गुन्हे मोबाइल विकून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने अनेकांना फसविले आहे. त्याच्या विरोधात सायन, डोंगरी व धारावी पोलिस ठाण्यात १५हून अधिक गुन्हे नोंद आहेत. मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यातही अशाप्रकारे फसवणूक केल्याचा संशय असून पोलिस तपास करत आहेत.
पैसेच मिळाले नाहीतसोनू कागदपत्रांवर कर्ज घेऊन मोबाइल खरेदी करत तो दुसऱ्या व्यक्तीला विकून महिलेला थोड्या वेळाने भेटणार असल्याचे सांगून निघून गेला. मात्र, बरेच दिवस उलटूनही महिलेला तिचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलेने धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला.