शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:20 IST

Raja Raghuvanshi Murder Case: पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. इंदूरमधील एका नाल्यात आरोपी सोनम रघुवंशीचा लॅपटॉप सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक सोनमच्या लॅपटॉपचा शोध होते. ओल्ड पलासियाजवळील नाल्यात शोध घेत असताना पोलिसांना एक पिस्तूलही सापडली. ही तीच पिस्तूल आहे, जी आरोपीने राजाला मारण्यासाठी खरेदी केली होती.

सोनमचा लॅपटॉप सापडलामिळालेल्या माहितीनुसार, सोनमचा लॅपटॉप नाल्यात फेकल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळपासून इंदूर पोलिसांनी याचा शोध सुरू होता. दरम्यान, आज पोलिसांनी तिन्ही आरोपींना (लोकेंद्र, शिलोम आणि बल्लू) समोरासमोर आणले. पहिल्यांदा आरोपी लोकेंद्र आणि शिलोमची कसुन चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकीदार बल्लूचीही सखोल चौकशी केली. पोलिसांच्या हाती लॅपटॉप आणि पिस्तुल लागल्याने या प्रकरणात महत्वाचे खुलासे होण्याची अपेक्षा आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?इंदुरचा रहिवासी राजा रघुवंशी(२९ वर्षे) आणि त्याची पत्नी सोनम हनीमुनसाठी मेघालयला गेले होते. यादरम्यान, सोनमने प्रियकराच्या मदतीने २३ मे २०२५ रोजी मेघालयातील शिलोंग येथे  राजाची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आरोपी पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर तीन आरोपी विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांच्यासह आतापर्यंत आठ आरोपींना अटक झाली आहे. 

नार्को चाचणीची मागणीराजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने दावा केला आहे की, सोनम आणि राज कुशवाहा हे फक्त मोहरे आहेत. खरे कट रचणारे अद्याप पुढे आलेले नाहीत. कुटुंबाने सोनम आणि राजची नार्को चाचणी करण्याची मागणी केली होती, ती फेटाळण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, जे त्यांना शिक्षा होण्यासाठी पुरेसे आहेत. अशा परिस्थितीत नार्को चाचणीची आवश्यकता नाही.

नवीन पात्रांची एन्ट्रीअलीकडेच, लोकेंद्र सिंग तोमर, प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स आणि सुरक्षा रक्षक बलवीर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुरावे लपवण्याचा आणि सोनमला आश्रय दिल्याचा आरोप आहे. याशिवाय, सोनमची जवळची मैत्रीण अलका हिचे नावही समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू