शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पोलिसाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीने विरोध केल्यामुळे केली तिची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 2:58 PM

Murder Case : मध्य प्रदेशातून सिवानला येत असताना ही घटना घडली. आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरने हे प्रकरण उघडकीस आणले.

बिहारमधील सिवान जिल्ह्यातील एका पोलिसाचे आपल्या मेहुणीशी अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. अनेक महिला पोलिसांशीही तो अवैध संबंध ठेवत होता. हा प्रकार पत्नीला समजल्यानंतर जोरदार भांडण सुरू झाले. पत्नी पती सुधारण्यासाठी आरोपी पतीला सतत बोलत असे. त्यामुळे संतापलेल्या पतीने तिचा विरोध करण्यासाठी तिच्या हत्येचा कट रचला. मध्य प्रदेशातून सिवानला येत असताना ही घटना घडली. आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरने हे प्रकरण उघडकीस आणले.

सुधीर प्रथम त्याच्या सिवान गावात आला आणि पत्नीला घेऊन पाटण्याला परीक्षेसाठी गेला. परीक्षा संपल्यानंतर ती पतीसोबत सिवानला परतत होती. यादरम्यान सुधीरने संधी साधून पत्नीची हत्या केली. पत्नीची अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.गोळ्यांचा आवाज कोणाला का आला नाही?गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ८ जानेवारीपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला. सिवानमधील पोलीस स्टेशन हद्दीतील  मदेशिलापुर गावात असलेल्या पुलावर ही घटना घडली, परंतु गोळ्यांचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही याबाबत पोलिसांना काही समजू शकलं नाही. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी सुधीर यादवलाही रडारवर घेतले.पोलिसांनी सुधीरच्या पाठीमागे अनेक छुपे खबरी लावले. हत्येचा तपास करणारे एसएचओ मनोज कुमार यांनी आरोपी सुधीर व्यतिरिक्त मृत पत्नी रिया देवीचा मोबाईल ताब्यात घेतला. पोलिसांनी दोन्ही क्रमांकांचे सीडीआर काढून त्यांचा सखोल तपास सुरू केला. तपासात सुधीरचा मोबाइल पत्नीसोबत अॅक्टिव्ह असल्याचे उघड झाले असून मोबाइलचे लोकेशनही पत्नीच्या मोबाईल लोकेशनला मॅच होत असल्याचे उघडकीस आले होते.

त्याआधारे पोलिसांनी तपास करून सुधीरची चौकशी सुरू केली, त्यात सुधीर यादवने पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. एसएचओ मनोज कुमार यांनी सुधीरची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सुधीरला अटक करून रविवारी कारागृहात पाठवले.मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो सापडलेचौकशीदरम्यान सुधीरने आपल्या मेहुणीशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे समजत आहे. मेहुणीशिवाय त्याने अनेक महिला पोलिसांशी संबंध ठेवले होते. सुधीरच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे संभाषण आणि फोटो सापडले आहेत. पोलिस मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून सुधीरबाबत अधिक माहिती घेत आहेत. लवकरच जबाब दाखल केल्यानंतर सुधीरला न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशBiharबिहारPoliceपोलिसArrestअटकMobileमोबाइल