मद्यपी चालकाकडून पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मार

By मनीषा म्हात्रे | Updated: January 12, 2024 17:46 IST2024-01-12T17:44:55+5:302024-01-12T17:46:08+5:30

पोलीस शिपाई अमित कदम यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

police kicked by drunk driver in mumbai | मद्यपी चालकाकडून पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मार

मद्यपी चालकाकडून पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मार

मुंबई : मद्यपी चालकाकडून पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दादरमध्ये घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात सुरेंद्र पवार (३१) याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई अमित कदम यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. कदम हे सहकाऱ्यांसह गुरुवारी सव्वा तीनच्या सुमारास दादर परिसरात गस्त घालत असताना, एक कार चालक मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. त्याला हटकताच त्याने पोलिसाला शिवीगाळ सुरु केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अखेर, अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

Web Title: police kicked by drunk driver in mumbai