खार दांडपाडा येथून पोलिसांनी जप्त केले भेसळयुक्त दूध, भेसळ करणारी टोळी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 20:57 IST2018-09-18T20:57:04+5:302018-09-18T20:57:20+5:30
व्यंकटेश गुंडाला (वय ४०) सविता कर्नाटकी (वय ३८) आणि यादगिरी नागेली (वय ४५), अनंत रेड्डी (वय ३८) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या

खार दांडपाडा येथून पोलिसांनी जप्त केले भेसळयुक्त दूध, भेसळ करणारी टोळी अटकेत
मुंबई - गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ८ च्या पथकाने खार येथील दांडपाडा येथून नामांकित कंपनीच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करताना रंगेहाथ टोळीला अटक केली आहे.
खार येथील चावकुटे चाळीत आज सकाळच्या सुमारास अचानकपणे धाड टाकली असता नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यंकटेश गुंडाला (वय ४०) सविता कर्नाटकी (वय ३८) आणि यादगिरी नागेली (वय ४५), अनंत रेड्डी (वय ३८) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रंगेहाथ भेसळ करताना या चौघांना अटक करण्यात आली. तसेच ४३० लिटर भेसळयुक्त दूध आणि अमूल कंपनीचे प्रिंट असलेल्या ५० रिकाम्या पिशव्या आणि भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.