पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:42 IST2025-12-08T11:41:59+5:302025-12-08T11:42:39+5:30
५ डिसेंबरच्या रात्री निरीक्षक अरुण कुमार राय यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही गोळी डोक्यातून आर पार गेली. त्यांची बंदूक खाली पडली होती.

पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक
जालौन - उत्तर प्रदेशच्या जालौन येथील पोलीस निरीक्षक अरुण कुमार राय यांचा मृत्यू संशयास्पद बनला आहे. जी महिला कॉन्स्टेबल मिनाक्षी शर्मा त्यांच्या खोलीतून किंचाळत बाहेर आली होती तिला अटक करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात मिनाक्षीच्या भूमिकेवर संशय होता. महिला कॉन्स्टेबल आणि पोलीस निरीक्षक यांच्यातील जवळीक मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. निरीक्षकाची पत्नी माया यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहेत.
५ डिसेंबरच्या रात्री निरीक्षक अरुण कुमार राय यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही गोळी डोक्यातून आर पार गेली. त्यांची बंदूक खाली पडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. रात्री ९.१५ वाजता महिला कॉन्स्टेबल निरीक्षकाच्या घरी पोहचली होती. ९.१८ मिनिटांनी ती घरातून ओरडत बाहेर आली. माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबल २०२४ पासून पोलीस निरीक्षकाच्या संपर्कात होती. त्याचवेळी दोघांमधील जवळीक वाढली. जुलै २०२४ कोंच पोलीस ठाण्यात मिनाक्षी आणि अरुण राय एकत्र होते. त्यानंतर राय यांची बदली उरईला झाली. मिनाक्षी कायम निरीक्षकाच्या घरी येत जात होती.
महिला कॉन्स्टेबल मिनाक्षीला पोलिसांनी ताब्यात घेत जेलला पाठवले. कॉन्स्टेबलच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून निरीक्षकाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. मिनाक्षी आणि अरुण यांच्यात प्रेमसंबंध होते. मृत्यूच्या आदल्या दिवशी महिला कॉन्स्टेबल आणि अरुण राय यांच्यात फोनवर बोलणे झाले होते. त्यात दोघांमध्ये वादावादी झाली. मिनाक्षी शर्मा अरुण यांच्या घरी पोहचली होती. तिला पाहताच अरुण यांनी बंदुकीतून गोळी झाडली. महिलेने काही आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. त्यातून ती अरुण यांच्याकडे २५ लाखांची मागणी करत होती. अलीकडेच तिने ३ लाखांचा हार घेतला होता. मिनाक्षी पोलीस कॉन्स्टेबल होती, परंतु ती लग्झरी लाईफस्टाईल जगायची. तिच्याकडे आयफोनसह ३ मोबाईल होते. २०१९ साली ती पोलीस खात्यात भरती झाली होती.