ठाणे - दोघांचे भांडण सोडवणारे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जयेश देसाई यांना शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की करत त्यांच्या खाकी वर्दीवर हात उचलणाऱ्या अफाक शेख (२०, रा. सावरकरनगर, ठाणे) याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.शेख याने टेम्पोचालक संतोष लादे याला कपाळावर दगड मारून जखमी केल्याचा प्रकार वागळे इस्टेट, आंबेवाडी येथे ५ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल देसाई यांनी मध्यस्थी केली. हा प्रकार सहन न झाल्याने शेख याने देसाई यांना धक्काबुक्की केली. त्यांची कॉलर पकडून दमदाटी करत त्यांना शिवीगाळही केली. या धक्काबुक्कीमध्ये त्यांच्या गणवेशाची दोन बटणेही तुटली. याप्रकरणी देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.
भांडण सोडवणाऱ्या हवालदारालाच मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 18:09 IST
न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
भांडण सोडवणाऱ्या हवालदारालाच मारहाण
ठळक मुद्दे देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.कॉलर पकडून दमदाटी करत त्यांना शिवीगाळही केली.