पोलिसांनी १३४४ किलो गांजा केला नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 20:46 IST2019-02-14T20:45:22+5:302019-02-14T20:46:13+5:30
समुद्रपूर पोलिसांनी २०१२ मध्ये गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला होता. त्या ट्रक मधून १३ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता.

पोलिसांनी १३४४ किलो गांजा केला नष्ट
वर्धा - समुद्रपूर पोलिसांनी एका कारवाई १ हजार ३४४ किलो गांजा जप्त केला होता. हा गांजा न्यायालयाच्या निकालाअंती गुरुवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जाळून नष्ट करण्यात आला.
समुद्रपूर पोलिसांनी २०१२ मध्ये गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला होता. त्या ट्रक मधून १३ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी हा गांजा नष्ट करण्यात आला असून या गांजाची सध्याची किंमत १६ लाख ३५ हजार २१६ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे, प्रदिप मैराळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ढोले, पोलीस निरिक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात प्रदिप देशमुख, गिरीश कोरडे, परवेज खान, अमर लाखे, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, हितेंद्र परतेकी यांनी केली.