शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

दारु न दिल्याने हिंजवडीत पोलीस शिपायाचा राडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 6:43 PM

रविवारी रात्री हॉटेल बंद झालेले असताना पोलीस शिपाई त्याच्या तीन साथीदारांसोबत रात्री एक वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये गेला होता. आला.

पिंपरी : पोलीस असल्याचे सांगूनही त्याच्या सहकाऱ्याला दारु न दिल्याने एका पोलीस शिपायाने हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये राडा घातला. हॉटेल मालकाला मारहाण करत शेजारील हॉटेलची मोडतोड करुन नुकसान केले. ही घटना रविवार(दि. ४) रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी, रामकिसन रमेश खैरनार (वय ३२ रा.आदर्शनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, पुणे शहरातील पोलीस शिपाई अक्षय धुमाळ याच्यासह त्याचा साथीदार अजय खोत व इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रविवारी रात्री हॉटेल बंद झालेले असताना पोलीस शिपाई अक्षय धुमाळ हा त्याच्या तीन साथीदारांना घेवून रात्री एक वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील हॉटेल एफएमएल येथे आला. त्याने फिर्यादी खैरनार यांना आम्ही पोलीस आहोत, तु आमच्या माणसाला त्यादिवशी दारु का दिली नाही, असे म्हणून खैरनार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. परत जात असताना बाजुच्या चायनिज दुकानाला लाथ मारुन त्याची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणात गुन्हा दाखल झाला असून अद्याप पोलिसांनी धुमाळ व त्याच्या साथीदाराला अटक केलेली नाही. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेल