राहत्या घरात सुरु असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट उध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:32 IST2019-08-11T21:29:45+5:302019-08-11T21:32:53+5:30
पोलिसांनी एका महिलेस आणि तीन पीडित मुलींना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

राहत्या घरात सुरु असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट उध्वस्त
मुंबई - अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार कांदिवली पश्चिमेकडील सेक्टर - २ मध्ये प्लॉट क्रमांक ५ काल पोलिसांनी धाड टाकून राहत्या घरातील वेश्याव्यवसायचे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७० (३), ३, ४, ५ आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी एका महिलेस आणि तीन पीडित मुलींना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
सदर महिला मोबाईल फोनवरून वेगवेगळ्या मुलींचे फोटो दररोज व्हाट्स ऍपद्वारे तिच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांना शेअर करत असे. त्यानंतर ग्राहक या महिलेच्या घरी जाऊन मुलगी पसंत करत आणि महिलेच्या राहत्या घराच्या बेडरूममध्ये ग्राहकांना पाठवून वेश्याव्यवसाय चालवीत असे. या ठिकाणी राहणाऱ्या महिलेस तीन पीडित मुलींसह वेश्याव्यवसाय चालवीत असल्याचं आढळून आल्याने महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.