पोलीस बोगस गिऱ्हाईक बनले; वेश्याव्यवसायास आणलेल्या तरुणीची केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 14:04 IST2019-09-18T14:03:30+5:302019-09-18T14:04:43+5:30
चार आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस बोगस गिऱ्हाईक बनले; वेश्याव्यवसायास आणलेल्या तरुणीची केली सुटका
नालासोपारा - विरार पश्चिमेकडील एका इमारतीमधील घरामध्ये वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या २० वर्षीय तरुणीची विरारपोलिसांनी सुटका केली असून चार आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
विरार पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी सुजाता रमेश शेलार (६०), पुष्पाबेन रतन संजेन (६०), अन्वराबीबी अल्लाउद्दीन गाझी (४०) आणि महादेव लक्ष्मण शिंदे (४०) हे एका २० वर्षीय तरुणीला वेश्याव्यवसायासाठी विरार पश्चिमेकडील शंभोदर्शन सोसायटीच्या सदनिका नंबर २०३ मध्ये घेऊन येणार आहे. यानुसार पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून धाड मारली आणि पीडित तरुणीची सुटका केली. आरोपीविरोधात विरार पोलीस ठाण्यात तरुणीला नेऊन वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले म्हणून पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.