पोलीसांकडून नागरिकांना मारहाणीचा खोटा व्हिडीओ व्हायरल; दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 04:14 PM2020-03-30T16:14:15+5:302020-03-30T16:29:15+5:30

उल्हासनगरात दोघांवर गुन्हे दाखल

Police beat civilians; fir regestered on two youths who viral Video hrb | पोलीसांकडून नागरिकांना मारहाणीचा खोटा व्हिडीओ व्हायरल; दोघांवर गुन्हा

पोलीसांकडून नागरिकांना मारहाणीचा खोटा व्हिडीओ व्हायरल; दोघांवर गुन्हा

googlenewsNext

उल्हासनगर : शहरातील गोलमैदान परिसरात पोलीस नागरिकांना मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्या प्रकरणी दोघांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अश्या व्हिडिओतून पोलिसांवर रोष व्यक्त होईल असे व्हिडीओ व्हायरल करू नका. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी केले.
उल्हासनगरातील गोलमैदान परिसरात पोलीस नागरिकांना मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ कोणतेही शहानिशा न करता रविवारी रात्री काही व्हाट्सअप ग्रुपवर शिवसेना पदाधिकारी विजय सावंत व बांधकाम व्यावसायिक राजू शेरा यांनी व्हायरल केला. या व्हिडीओ मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसां विरोधात शहरातून रोष निर्माण होऊ शकतो. असी अफवा पसरविल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन दोघा विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पत्रकारांना दिली. 
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची जबाबदारी आपली सर्वांची असून असे फेक व्हिडीओ व फोटो कोणत्याही ग्रुपवर व्हायरल करू नका. अशी विनंती शहरवासीयांना पोलीस अधिकारी राजेंद्र कदम यांनी केली आहे.

Web Title: Police beat civilians; fir regestered on two youths who viral Video hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.