कुत्र्यावर बेदरकारपणे कार चालविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:56 IST2018-11-28T20:53:48+5:302018-11-28T20:56:33+5:30
एका विकृत तरुणाने कार कुत्र्याच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. कारखाली भटक्या कुत्र्याला चिरडून त्याचा जीव घेण्यात आला. या सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

कुत्र्यावर बेदरकारपणे कार चालविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई - घाटकोपर परिसरात हेतूपुरस्कार तरुणाने एका भटक्या कुत्र्याच्या जीव घेतल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २१ नोव्हेंबरला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास जाणीवपूर्वक एका विकृत तरुणाने कार कुत्र्याच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. कारखाली भटक्या कुत्र्याला चिरडून त्याचा जीव घेण्यात आला. या सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या आणि पेटा या प्राण्यांच्या संघटनेशी संबंधित शुभम महाडिक यांनी या घटनेबाबत मुंबई पोलिसांना कळवून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंतर पोलिसांनी प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल ऍक्ट १९६० च्या कलम २७९ आणि ४२९ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपीची कोर्टाने जामिनावर मुक्तता केली आहे.