शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 1:13 PM

आरोपीने घरी निघालेल्या एका मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.

ठळक मुद्देन्यायालयाचा आरोपीला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश

पिंपरी : रस्त्यावरून घरी निघालेल्या एका मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास तळेगाव दाभाडे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. आरोपीला ट्रकसह जळगावमधील मुक्ताईनगर येथून अटक करण्यात आली आहे. करमवीर गुलाब जैसवार (वय ३०, रा. मानकोली फाटा, दिवे गाव, भिवंडी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित मुलगी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील गहुंजे गावाच्या नजीक असणाऱ्या पुलावरून घरी एकटीच चालली असल्याचे आरोपीने पाहिले. याप्रसंगी त्याने पीडित मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिचे कपडे फाडून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात चिंतेचे वातावरण होते. आरोपीला तत्काळ अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूहोते. घटनेनंतर आरोपी पसार झाला. गुन्हा उडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी तपास सुरूकेला. त्यासाठी आजूबाजूच्या परिसरात परराज्यातून आलेल्या मजुरांची चौकशी केली. यातून काही माहिती मिळाली नाही. पुढे टोलनाक्यावरून काही महत्त्वाचे धागेदोरे हाताशी आले. आरोपी एका कंपनीच्या ट्रकवर काम करत असल्याची माहिती मिळाली. तो ट्रक नागपूरला रवाना झाला असल्याचे सांगण्यात आले. शेवटी आरोपी करमवीरला मुक्ताईनगर येथून अटक करण्यात आली. त्याला विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.  ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चिंचकर, पोलीस नाईक अतिश जाधव, पोलीस हवालदार सतीश मिसाळ, राम बहिरट यां नी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारArrestअटकPoliceपोलिसCourtन्यायालय