शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या अाराेपीला पाेलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:33 IST

विविध १६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पाेलीसांनी अटक केली अाहे. खून व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल अाहेत.

चिंचवड: विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल  असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात चिंचवड पोलिसांना अखेर यश आले आहे. रणजित बापू चव्हाण उर्फ रंज्या (२३, रा.वेताळनगर,चिंचवड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. चिंचवड,निगडी,वाकड व वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत त्याच्यावर विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल असून यात खून व खुनाचा प्रयत्न असे ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

    अनेक दिवसांपासून पोलीस यंत्रणा याचा शोध घेत होती. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा  गुन्हेगार वारंवार पळ काढत होता.याच्या त्रासाला व दाहशतीला अनेक जण घाबरत होते. चिंचवड गावात भर चौकात आकाश लांडगे या तरुणाचा मे महिन्यात खून झाला होता. या खुनातही हा सहभागी असल्याची चर्चा होती. इतर पोलीस स्टेशन हद्दीतही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर होती. चिंचवड पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार रणजीत याला उस्मानाबाद जवळील भूम येथून अटक करण्यात आली असल्याचे चिंचवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी सांगितले आहे.पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडीMurderखूनPoliceपोलिस