शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 9:20 PM

दोघांनी तब्बल 53 लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देदोघांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दोघांनी साथीदारांच्या मदतीने इंदौरमधून तब्बल 53 लाख 72 हजार काढल्याचे समोर आले आहे.

पुणे -  कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून 94 कोटी रुपयांच्या लुटीप्रकरणी एटीएम केंद्रातून पैसे काढणा-या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. दोघांनी तब्बल 53 लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे. सलमान मोहम्मद नईम बेग (वय 31), शेहबाज फारूक शेख (वय 29, रा. अंबर व्हिला, रा. मुंब्रा ठाणे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मागील  वर्षी  (ऑगस्ट 2018) गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विचवर (सर्व्हर) हल्ला चढवून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये पळविले होते. सायबर चोरट्यांनी मालवेअरवर हल्ला करून त्याव्दारे व्हिसा व रूपे डेबीट कार्ड धारकांची माहिती चोरली होती. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकाची (एसआयटी) नेमणूक केली होती. तपासात देशातील कोल्हापूर, मुंबई तसेच अजमेर व इंदौर शहरातील एटीएम केंद्रातून काही रक्कम काढण्यात आल्याचे समोर आले होते.  तांत्रिक तपासानुसार पोलिसांनी यापुर्वी 13 आरोपींना अटक केली होती. इतर आरोपींचा शोध घेतला जात असून तपासात इंदौर येथून पैसे काढणा-यांची माहिती घेत असताना टोळीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार दोघे आरोपी ठाण्यात असल्याचे समजले. त्यानुसार, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या पथकाने या दोघांना अटक केली. दोघांनी साथीदारांच्या मदतीने इंदौरमधून तब्बल 53 लाख 72 हजार काढल्याचे समोर आले आहे.  दोघांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   

टॅग्स :Arrestअटकcyber crimeसायबर क्राइमPuneपुणेbankबँक