शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल चोरी करणाऱ्या 6 अाराेपींना पाेलिसांनी सापळा रचून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 18:57 IST

रेल्वे ट्रॅक लाईनच्या कामासाठी अाणलेल्या 400 लिटर डिझेलची चाेरी करणाऱ्या चाेरट्यांना पुणे ग्रामीण एलसीबी टीमने ताब्यात घेतले अाहे.

 वळती : रेल्वे ट्रॅक लाईनच्या कामासाठी अाणलेल्या 400 लिटर डिझेलची चाेरी करणाऱ्या चाेरट्यांना पुणे ग्रामीण एलसीबी टीमने ताब्यात घेतले अाहे. 6 अाराेपी व चाेरलेला मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. 

           पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकांत विठ्ठल खरमाटे (रा.चाकण ता.खेड जि.पुणे ) हे रेल्वे लाईन ट्रॅक तयार करण्याचे काम करतात. सध्या त्यांचे वळती येथे रेल्वे लाईन ट्रॅक बनविण्याचे काम चालू अाहे. त्या कामाकरता तेथील जेसीबी, पोकलेन व हायवा यासाठी आवश्यक असणारे डिझेल इंधन हे तेथील लेबर कॅम्प शेजारी  बॅरलमध्ये साठा करून ठेवतात.  दिनांक १३ जुलै २०१८ रोजी तेथील कामावरील कामगार झोपले असताना रात्री ०२.३० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅरल मधील एकूण ४०० लिटर डिझेल 28 हजार चारशे 52 रुपये  किंमतीचे चोरून नेले. याबाबत लाेणी काळभाेरला गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. 

       गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी करून आजूबाजूच्या परिसरात वेषांतर करून फिरून माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या परिसरामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने व गुन्ह्याचे घटनास्थळ निर्जन ठिकाणी असल्याने माहिती मिळण्यास अडचण येत हाेती. सदरचा गुन्हा हा आरोपींनी मोटरसायकल वर येऊन केल्याची माहिती मिळाल्यावरून आरोपी हे आजूबाजूच्या गावातीलच असल्याची पोलिसांची खात्री झालेले त्या दिशेने वळती, शिंदवणे, तरडे, सोरतापवाडी गावात वेषांतर करून तपास केला.

      गुन्हे शाखेच्या पथकाला शेजारच्या तरडे गावातील नवनाथ दादासाहेब बरकडे हा चोरीचे डिझेल कमी भावात विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली. नवनाथ बरकडे व त्याचे पाच सहा साथीदार यांनीच सदर गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीसांनी नवनाथ दादासाहेब बरकडे (वय १८ वर्ष) ,विशाल लक्ष्मण केसकर (१९ वर्ष) सुदाम मल्हारी केसकर (वय २१ वर्ष), वैभव दिलीप काळे वय (१९ वर्षे), अक्षय शांताराम टुले वय (२१ वर्षे), विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे पोलीसी खाक्यात चौकशी केली असता आरोपींनी डिझेल चाेरल्याची कबुली दिली.

       हा गुन्हा उघडकीस आणणेसाठी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, महेश गायकवाड, निलेश कदम, नितीन गायकवाड, विजय कांचन यांनी महत्वाची कामगिरी केली आहे. तरडे येथे नविन भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल, डिझेल डेपोचे काम चालू असून तेथील कामावरूनही यापूर्वी डिझेल चोरी झालेची माहीती मिळाली आहे. यातील आरोपींनी आणखीन काही गुन्हे केले आहेत काय यादृष्टीने तपास चालू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाtheftचोरीnewsबातम्या