तरूणाला बनायचं होतं प्लेबॉय, मोबाइल नंबर लिहून लोकांच्या घरात फेकल्या चिठ्ठ्या आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:50 IST2022-12-31T14:50:12+5:302022-12-31T14:50:27+5:30

Crime News : ही घटना रायपूर भागातील आहे. आधी तर लोकांनी त्या नंबरच्या माध्यमातून तरूणाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

Police arrested college student who wanted to become sex playboy in Raipur Chhattisgarh | तरूणाला बनायचं होतं प्लेबॉय, मोबाइल नंबर लिहून लोकांच्या घरात फेकल्या चिठ्ठ्या आणि मग...

तरूणाला बनायचं होतं प्लेबॉय, मोबाइल नंबर लिहून लोकांच्या घरात फेकल्या चिठ्ठ्या आणि मग...

Crime News :  प्लेबॉय बनण्याची इच्छा एका तरूणाला इतकी महागात पडली की, त्याला आता तुरूंगाची हवा खावी लागू शकते. ही घटना छत्तीसगढच्या रायपूरची आहे. इथे राखी पोलिसांनी कॉलेज विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याला प्लेबॉय बनायचं होतं. यासाठी तो त्याचं नाव आणि मोबाइल नंबर लिहिलेल्या चिठ्ठ्या लोकांच्या घरांमध्ये फेकत होता.

ही घटना रायपूर भागातील आहे. आधी तर लोकांनी त्या नंबरच्या माध्यमातून तरूणाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. दुसरीकडे तरूणाचं हे काम सुरूच होतं. रोज अनेक घरांमध्ये त्याच्या चिठ्ठ्या मिळू लागल्या होत्या. तेव्हा राखी पोलीस स्टेशनमध्ये लोकांनी तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी तपास सुरू केला आणि तरूणाला पकडलं. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरूण कॉलेजमध्ये शिकतो. त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्याने ज्या चिट्ठ्या लोकांच्या घरात फेकल्या होत्या, त्यात त्याने स्वत:ला सेक्स वर्कर सांगितलं होतं. 

पोलिसांनी सांगितलं की, लोकांच्या तक्रारीनंतर लगेच कारवाई करत तरूणाला अटक करण्यात आली आहे. तरूणाचे चौकशी सांगितलं की, मित्रांच्या दबावामुळे त्याने असं केलं. सध्या केसची वेगवेगळ्या अॅंगलने चौकशी केली जात आहे.

Web Title: Police arrested college student who wanted to become sex playboy in Raipur Chhattisgarh