फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 00:05 IST2018-11-06T00:05:17+5:302018-11-06T00:05:59+5:30

न्यायालयात तारखेला घेऊन येत असताना फरार झालेल्या 35 वर्षीय आरोपीला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Police arrested accused | फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

मुंबई - न्यायालयात तारखेला घेऊन येत असताना फरार झालेल्या 35 वर्षीय आरोपीला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. योगेश कन्नुभाई दर्जी (35) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. 3 नोव्हेंबरला त्याला न्यायालयापुढे हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. त्या वेळी त्याने पलायन केले होते.
याप्रकरणी भादंवि कलम 224 अंतर्गत आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी योगेश अंधेरी डी. एन. नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीधनकर, अतिरिक्त निरीक्षक पाटणकर, पोलिस नाईक निखाळे व पालांडे यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्याला अखेर ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

Web Title: Police arrested accused